अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने पाकिस्तानला फटकारले त्यावरुन भविष्यात पाकिस्तान चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे. चीनने पाकिस्तान मध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे.पाकिस्तानात जिवानी बंदरावर लष्करी तळ उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. इराणच्या चाबहार पासून हे बंदर जवळच असेल. इराण, भारत आणि अफगाणिस्तान या तिघांनी मिळून चाबहार बंदर विकसित केले आहे. चाबहार बंदरामुळे भारताचा मध्य अशियायी देशांशी व्यापाराचा मार्ग मोकळा झाला आहे.समुद्री चाच्यांविरोधातील कारवाईसाठी तैनात असणा-या आपल्या नौसैनिकांच्या सोयीसाठी आपण जिवानी बंदरावर तळ उभारत आहोत असे चीनकडून अधिकृतरित्या सांगितले जात आहे. पण चीनचा इतिहास तपासला तर चीन जे बोलतो तसा कधीच वागत नाही. समुद्रात टेहळणी क्षमता वाढवण्याचा यामागे चीनचा छुपा हेतू आहे. चीनने काही महिन्यापूर्वीच श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर ९९ वर्षाच्या भाडेतत्वावर चालवायला घेतले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews